Monday, February 19, 2007

मराठी मरत नाहीये....

सर्वांना माझा सप्रेम नमस्कार,

श्रीमती गद्रे यांचा ईमेल वाचला. तसेच JPEG ही वाचली. मलाही JPEG मधले मराठी सर्वांपेक्षा श्रेष्ट -- हा विचार पट्ला नाही. सर्व भाषा सारख्याच आहेत. मुख्य म्हणजे भाषा हे एकमेकांमध्ये संवाद साधण्याचे साधन आहे. माझ्या मते भाषा केव्हा मरते जेव्हा भाषेचा विकास थांबतो. नाट्य, संगीत, कविता, चित्रपट वगैरे यांचा दर्जा जेव्हा घसरतो तेव्हा. काही वर्षांपूर्वी मराठी चित्रपटांचा दर्जा इतका घसरला होता की आपण चित्रपटांकडे पाठ फिरवली होती. पण आता पुन्हा मराठी चित्रपटस्रुष्टी उत्तम कला सादर करत आहे. आंतर-महाविद्यालयीन स्पर्धांमधे उत्तमोत्तम कलाकृती सादर होत आहेत. मराठी वाङमय बाजारात येत आहे. नुकतेच आलेले 'संभाजी', मारुती चितमपल्लींचे लेखन वगैरे खुप श्रेष्ठ दर्जाचे आहे. "आयुष्यावर बोलु काही" या कार्यक्रमाने तर शंभरी पूर्ण केली. Wikipedia मध्ये सुध्धा मराठी प्रत आहे. Internet वर मराठी चा मात्र इतका प्रसार झाला नाही आहे. उत्तम प्रतीचे मराठी साहीत्य internet वर उपलब्ध नाही. ते केवळ Blog, शहरांची माहीती इत्यादी पर्यंत मर्यादीत आहे. पण ही परिस्थीति पण आता सुधारत आहे.

माझ्यासारखा MSc in Microtechnology करणारा जर ही ईमेल मराठीत पूर्णपणे लिहित असेल तर ...... मग आता.

मराठी compusary करून तर मराठी कधीच टिकणार नाही. (महान महाराष्ट्र सरकारची मर्कट्लीला). उलट मराठी बद्द्ल चीड निर्माण होईल. भाषा glorify होत नाही तोपर्यंत आपल्याच लोकांना कळणार कसे की hardy boys सारखाच फास्टर फेणे, नंदु नवाथे पण आहे. जसा Tom Hanks आहे तसाच अतुल कुलकर्णी पण आहे.......

असो आता बोलणे संपवतो.

आपला सर्वांचा, नीरज अड्सूळ.